जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, कोल्हापूर
महिला स्वयंसहाय्यता गट सक्षमीकरण अभियान
स्वर्ण जयंती ग्रामस्वरोजगार योजना
i1

मा. विमल पाटील 

अध्यक्ष
i3

श्री. अविनाश सुभेदार
मुख्य कार्यकारी अधिकारी
i2

श्री. पी.बी.पाटील
प्रकल्प संचालक,
जि.ग्रा.वि.यं.कोल्हापूर
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा या जिल्हा स्तरावरील केंद्र शासन पुरस्कृत स्वायत्त संस्थेमार्फत मुख्यत्वे करून केंद्र  शासनाने  ग्रामीण विकासाबरोबरच दारिद्रय निर्मुलनासाठी विविध रोजगार आणि  स्वयंरोजगार निर्मीतीचे कार्यक्रम राबविले जातात. यामध्ये व्यक्तीगत  लाभार्थीच्या योजनांबरोबरच ग्रामीण भागातील जनतेचे जीवनमान उंचावणेसाठी  आवश्यक असणा-या सामाजिक मालकीच्या मत्ता निर्मीतीचे कार्यक्रम राबविले जातात. यामध्ये स्वर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजना, इंदिरा आवास योजना इ.  महत्वाच्या योजनांचा अंतर्भाव होतो. केंद्र शासनाबरोबरच राज्य शासनाकडूनही  या योजनांसाठी ठराविक प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जातो. जिल्हा ग्रामीण  विकास यंत्रणा कोल्हापूर मार्फत खालील (अ.नं. १ ते ३ ) योजना राबविणेत येत आहेत.

गुणवत्ता यादी प्रसिध्दी

दक्षता व सनियंत्रण समिती सभा दि.२९ डिसेंबर २०१२ स.११.०० वाजता मा.खासदार सदाशिवराव मंडलिकसो यांचे अध्यक्षतेखाली पार पडली.